Skip to main content

जोतीराव गोविंदराव फुले - Mahatma Fule Important Quotes ..


🕯जोतीराव गोविंदराव फुले - .🕯...⛛
♩♩♩
अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करू या!...📕📕
ज्योतीबांनी केलेले कार्य विधायक होते.प्रत्यक्ष कार्य करूनच त्यांनी समाजातील उपेक्षितांना पुढे...
नेण्यासाठी परिश्रम घेतल्यामुळे . समाजाने त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला आहे. ज्योतीबांचे पूर्वज सातार्यापासून जवळ असलेल्या कटगुण गावात राहात होते. त्यावेळी त्यांचे आडनाव गोऱ्हे असे लावले जाई. पुढे गोऱ्हे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. तेथे ज्योतीबांचे वडील गोविंदपंत फुलांचा व्यवसाय करून उपजीविका करीत होते. त्यांनी फ़ुलांच्या व्यवसायात कौशल्य, कीर्ती, आणि फार यश.... मिळविले त्यामुळे गोऱ्हे हे आडनाव जावून त्यांना  ‘फुले’ हे नाव कायम स्वरूपीच मिळाले. पुढे...# गोविंदराव भाजीपाल्याचा व्यवसाय करू लागले. त्यात त्यांचा चांगला जम बसला. नंतर गोविंदरावांनी धनकवडीच्या झगडे  घराण्यातील चिमणाबाई सोबत विवाह केला. त्यांना दोन मुले झाली. थोरला राजाराम व धाकटा ज्योतिबा, महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक व द्लीतोद्धारक जोतिबा फुले यांचा जन्म २० फेब्रुवारी १८२७ रोजी पुण्यास झाला.....
🕯वयाच्या सातव्या वर्षी ज्योतिबा शाळेत जावू लागले. पण  ‘शूद्राने शाळेत शिक्षण घेणे हे महापाप आहे’ असे कुणा एका र्कमठाने गोविन्रावांचे कान.... फुंकल्यामुळे त्यांनी मुलाला शाळेतून काढून मळ्यातील कामाला जुंपले. पण तिथेही फावल्या वेळेत तो पुस्तके वाचण्यात रमल्याचे पाहून एका मुसलमान व एका इंग्रज गृह्स्थाने गोविन्द्रावान्ना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे त्यांनी पुन्हा ज्योतीबाला मिशनर्यांच्या इंग्रजी शाळेत टाकले.  इंग्रजी शाळेत जावून ती भाषा चांगली समजू.... लागल्यावर त्यांनी  ‘ राईट ऑफ मान ‘ ( मानवाचे हक्क ) हे toms pen या इंग्रज लेखकाचे पुस्तक वाचले. आणि त्यांना हिंदू समाजातील व धर्मातील विषमता ईश्वर निर्मित नसून हे मानव निर्मित आहे हे कळून आले त्यातून त्यांच्या परांजपे नावाच्या.... मित्राच्या लग्नात वराती मागून जाताना त्यांना एका ‘ शुद्र ‘ म्हणून तिथून निघून जायला सांगितले. या अपमानाने त्यांच्या अंगात अंगार फुलला मग त्यांनी विषमते विरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. हिंदू समाजातील मतलबी रुढीचा त्यांना तिरस्कार वाटू लागला. ज्योतीबांनी शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण करतानाच लहूजी वस्तादांकडून शारीरिक व्यायामाचे प्रकार आणि काही शास्त्रांचे ज्ञान संपादन केले होते. त्यातही त्यांनी कीर्ती संपादन ....केली.....🕯
🕯१८४७ पर्यंत जोतिबा बुद्धीने चांगले प्रौढ झाले होते. त्यांनी समाजाचे बार्काईने निरीक्षण केले.त्यातून त्यांच्या असे लक्षात आले कि आपला हिंदू समाज जाती भेदाने आणि विशिष्ट वर्गाच्या गुलामगिरीत राहून प्रतिगामी बनला आहे. स्त्रिया आणि शुद्र यांची कुचंबना होत आहे.हे सर्व स्त्रिया आणि बहुजन समाज शिक्षणा पासून दूर राहिल्यामुळे घडत आहे. हे सर्व त्यांच्या निदर्शनाला आल. त्यावरून त्यांनी भावी जीवनातील कार्याची दिशा ठरविली. ते सरकारी... नौकरीच्या मागे न लागता समाज कार्य करायचे ठेवून कामाला लागले. सामाजिक गुलामगिरी दूर करणे आणि सर्वांनला शिक्षणाची दारे खुली करणे यासाठी प्रयत्नशील राहणे हे त्यांच्या जीवनाचे धैर्य ठरले.🕯
🕯जोतिबा फुले यांनी पुण्यात भिडेवाडयात ‘ मुलींची शाळा ‘ काढुन एकच खळबळ निर्माण केली. त्यांचे हे कार्य तत्कालीन रूढीप्रिय समाजाला रुचले नाही.मुलींची शाळा काढण्यासाठी पूर्व तयारी म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला प्रथम शिक्षण दिले. सावित्रीबाईनींहि आपल्या पतीच्या जीवन कार्याला मनापासून सहाय्य केले. १८४८ मध्ये पहिली १८५१ मध्ये दुसरी आणि १८५२ मध्ये तिसरी मुलींची शाळा काढली. या शाळा व्यवस्थित चालू लागल्या. मेजर कॉन्डी यांनी सरकार तर्फे ७५ रु अनुदान मंजूर केले. फुले यांच्या या महान सामाजिक कार्याचा गौरव🕯 म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर जोतिबांनी सामाजिक सुधारनांकडे विशेष लक्ष द्यायचे ठरविले.व्यक्ती स्वातंत्र्य, समता, आणि.....
... बुद्धीप्रामान्य या साठी ते झगडू लागले. सतीची प्रथा, विधवा पुनर्विवाह, भ्रुणहत्या ,या समाज विघातक गोष्टींना त्यांनी विरोध केला, केवळ शाब्दिक विरोध न करता त्यांनी पुढाकार घेउन ‘ बालहत्या प्रतिबंधगृह ‘ हि संस्था सुरु केली. समाजात स्पृश्य -अस्पृश्य असा भेदाभेद पाळनारांचा रोश पत्करून त्यांनी आपल्या घराजवळचा पाण्याचा हौद सर्वांना म्हणजे अस्पृश्यांनाहि खुला केला....
शेतकऱ्यांचा मोठा वर्ग वर्षानुवर्ष अज्ञान, गुलागिरी याने त्रस्त झालेल्या होता .🕯 हा वर्ग असंघटीत होता म्हणून त्यांचे हाल होतात हे ओळखून ज्योतिबायांनी कार्य केले . त्यातूनच ‘सत्यशोधक समाज’ स्थापन झाला . अज्ञान हेच सर्व अनर्थाचे मूळ आहे अशी त्याची समजूत असल्याने त्यांनी शिक्षणाचे मह्त्व.. समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सामजिक प्रश्नांवर जे चिंतन केले होते . त्यावर लेखनही केले.  ‘शेतकऱ्याचा आसूड’ ‘ब्राम्हणाचे कसब’, ‘ गुलामगिरी’ ‘तृतीय रत्न(नाटक)’,...🕯 ‘शिवाजीचा पोवाडा’, तसेच सार्वजनिक सत्यधर्म’, असे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्यांनी  ‘अखंड ‘ नाव देऊन काही अभंगांचेही लेखन  केले. मूलगामी आणि तर्कशुद्ध अशा त्यांच्या चिंतनातून पुढील ओळी... निर्माण झाल्या. ‘गुलामगिरी’ मधील त्या ओळी अशा आहेत  –  ‘विधेविना मती गेली । मतीविना नीती गेली । ......



नितीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविनाशुद्र खचले । इतका अनर्थ एका विधेविना केला ।।। शिक्षण हेच समाज – मानस परिवर्तनाचे प्रभावी मध्यम आहे, हे लक्षात येताच अस्पृश्यासाठी, स्त्रियांसाठी त्यांनी शाळा काढल्या , अनाथाश्रम काढले  ,वृत्तपत्रे काढलीत ,धर्म जन्माने न मिळता🕯 माणसाने स्व:त च्या बुद्धीने स्वीकारला पाहिजे..... शेतकर्यानच्या व्यथा इंग्रज प्रश्यासनाच्या कानी पोहचविल्या,शेतकरी हा समाजाचा कणा आहे. पोशिंदा, अन्नदाता आहे, असे मत त्यांनी🕯 मांडले.आणि जनजागृती केली. त्यांच्या साठाव्या वर्षी जनतेने मुंबईस त्यांचा सत्कार करून त्याना ‘ महात्मा ‘ हि पदवी बहाल केली.  ६३ वर्षे ते चंदना सारखे झिजले. प्रवास केला, व्याख्याने दिली, लेख लिहिले,स्वातंत्र्य , समता, लोकशाही, विज्ञान, इह्वाद, या आधुनिक मुल्यांवर भर देवून सामाजिक क्रांतीची पेरणी केली. डॉ. आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले.🕯9 सहज सोप्या भाषेत नेमकी स्पष्टता आनने त्यांना जमत असे. विच्यारांना कृतीशिलतेची जोड दिली. ‘ जैसे बोलणे बोलावे तैसे चालणे चालावे’ मग महंत लीला स्वभावे, अंगी बाणे’. या समर्थ वचनांची.... सार्थकता सिद्ध करणारा हा माहात्मा सर्व सुखांचे आगर, नीती तत्वांचे माहेर, असा हा महात्मा अविरत कष्टाने २८ नोहेंबर १८९० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांना आपले सर्वांचे कोटी कोटी प्रणाम !....♩♩
....




...........
महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:
🕯विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।🕯।
🕯बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील🕯 शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे..... पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या📒📒📒 मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले....📗📗📗📗

Comments

Popular posts from this blog

Maharashtra Police Bharti 2019 - महाराष्ट्र पोलीस भरती सुरु Vacancy District wise....

Maharashtra Police Bharti 2019 - महाराष्ट्र पोलीस भरती सुरु 😄 Police bharati chya jaga 2019.... Police bharti 2019 Districts wise vacancy  ....... Best of luck

Rajratan Dhutraj photo

Rajratan Dhutraj 

Marathi Suvichar ...100

500+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार  Marathi Suvichar Sangrah जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुविचाराची गरज असते.सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस  हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी येथे  सvbghhर्वात लोकप्रिय सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार – Marathi Suvichar संग्रह घेउन आलो…… सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah “खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.” “विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जेuuuui योग्य वाटत तेच करा.” “यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”.... “आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.”..... “अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.” “मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.”....hhjj8 “चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते....” “जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ...